Skip to content Skip to footer

बलात्काराचा आरोप राष्ट्रवादीचा नेता भर पत्रकार परिषदेत ढसा-ढसा रडला

बलात्काराचा आरोप राष्ट्रवादीचा नेता भर पत्रकार परिषदेत ढसा-ढसा रडला

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर भाजपाकडून बलात्काराचा आरोप लावण्यात येत असून स्वतः महेबूब शेख यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिस यंत्रणेकडे केली आहे मात्र भाजप राजकीय फायदा उठवण्यासाठी षडयंत्र करत असून बदनाम करण्याचे काम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

‘मी कोणत्याही चौकशीला तयार आहे. माझे मोबाइल रेकॉर्ड तपासा, अगदी नार्को टेस्टही करा. दोषी असलो तर फासावर जायला तयार आहे असे मेहबूब शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी बोलताना झालेल्या आरोपांवर शेक यांना अश्रू अनावर झाले आणि पत्रकार परिषदेत ते रडताना दिसून आले होते.

१४ नोव्हेंबर रोजी मेहबूब शेख यांनी भेटायला बोलावून माझ्यावर बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने संभाजीनगरच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीनंतर भाजपने राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे. त्याविरुद्ध भाजपकडून आंदोलनही केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावर झालेल्या खोट्या आरोपावरून शेख यांना अश्रूं अनावर झालेले पाहायला मिळाले होते.

Leave a comment

0.0/5