Skip to content Skip to footer

कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा विकासासाठी, नामांतराचा विषय श्रद्धेचा – चंद्रकांत खैरें

कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा विकासासाठी, नामांतराचा विषय श्रद्धेचा – चंद्रकांत खैरें

औरंगाबादच्या नामकरण मुद्यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केल्यावर हाच मुद्दा पकडून भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला लक्ष केले होते. आता भाजपच्या या टीकेला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून जोरदार हल्ला भाजपवर चढवण्यात आलेला आहे. त्यातच शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरें यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

औरंगाबादचे नामांतर हा श्रद्धेचा विषय आहे. ८ मे १९८८ ला आम्ही सगळे नगरसेवक झालो होतो. त्यावेळी शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळेस- विजय मिळाव्यात शिवसेनाप्रमुखांनी जनतेचे आभार मानले होते.

तसेच कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा विकासाचा असतो. नामांतराचा विषय हा श्रद्धेचा असतो. हा मुद्दा खरंतर क्लिअर केलं पाहिजे. संभाजी महाराजांच्या नावाला विरोध केला तर तुमच्या घरावर दगडफेक होईल. काँग्रेसला खरंतर मुस्लीम मतांची आशा आहे. संभाजी महाराजांचे शेवटचे चार महिने इथे गेले. त्यामुळे या शहराचं नामकरण संभाजीनगर झाले पाहिजे”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी मराठी वृत्तवाहिनीला दिली.

Leave a comment

0.0/5