आपल्याच वक्तव्यावरून केंद्रीय मंत्र्यांचा घुमजाव, ठराविक लोकांचा देण्यात येणार कोरोना लस मोफत

आपल्याच-वक्तव्यावरून-कें-From your own statement

आपल्याच वक्तव्यावरून केंद्रीय मंत्र्यांचा घुमजाव, ठराविक लोकांचा देण्यात येणार कोरोना लस मोफत

करोना लसीसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतील की, दिल्लीप्रमाणे मोफत दिली जाणार आहे? असा प्रश्न हर्ष वर्धन यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले,”फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोना लस मोफत दिली जाणार आहे,” अशी माहिती त्यांनी प्रसार मद्यमांसमोर दिली होती.

मात्र सकाळी केलेल्या विधानावरून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्र्याने अक्षरशः पलटी मारली आहे. काही ठरावीक लोकांनाच कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याचं ट्विट डॉ. हर्षवर्धन यांनी केल्याने देशातील सर्वच नागरिकांना धक्का दिला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी कोरोनाची लस किती टप्प्यात वितरीत केली जाईल याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. पहिल्या टप्प्यात ३ कोटी लोकांना कोरोनाची लस मोफत दिली जाईल. त्यात १ कोटी आरोग्य कर्मचारी आणि दोन कोटी फ्रंटलाईन वर्करचा समावेश असेल. प्राथमिकता यादीतील इतर 27 कोटी लोकांना जुलैपर्यंत लस देण्यात येणार आहे. मात्र सामान्य लोकांना ही लस मोफत मिळणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here