पंतप्रधानांकडून भेटीसाठी वेळ मिळत नाहीये; संभाजीराजे यांनी व्यक्त केली खंत

पंतप्रधानांकडून-भेटीसाठ-For a visit from the Prime Minister
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारकडून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न होताना दिसत आहे. हा विषय पंतप्रधानांच्या कानावर घालण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले वेळ मागितली आहे. मात्र, पंतप्रधानांकडून वेळ मिळत नसल्याची खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली आहे.
“मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालायने स्थगिती दिली आहे. त्यानंतर राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला देण्याचा निर्णय घेतला. मुळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणारे ईडब्लूएस आरक्षण सर्व खुल्या वर्गासाठी आहे. ते केवळ मराठा समाजासाठी नाही. हे आरक्षण घेतल्यानं एसईबीएसला धोका निर्माण होईल. ई़डब्लूएस आरक्षण घेतल्यानं समाजाला धोका निर्माण होणार नाही, हे सरकारनं स्पष्ट करावं मराठा समाजाने सामाजिक मागास सिद्ध केलं आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण हवे आहे, असं सभाजीराजे म्हणाले.
“मराठा आरक्षणाविषयी पंतप्रधान मोदी यांच्याकडून अजूनही भेटीची वेळ मिळालेली नाही. ते वेळ देण्याची आजही आपण प्रतीक्षा करत आहोत,” अशी खंत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली. औरंगाबाद शहराचे संभाजी महाराज यांच्या नावाने नामकरण होत असेल, तर त्याचे स्वागत करायला हवे. नामकरणाच्या निर्णयास आपले समर्थन आहे,” असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला. राज्य सरकारने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवली होती. त्यामुळे राज्य सरकारने ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यामुळे मराठा आरक्षणाला धोका पोहचणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here