जागा आणि वेळ तुम्ही सांगा मी तिथे येते, उर्मिलाचे कंगनाला खुले आवाहन

जागा-आणि-वेळ-तुम्ही-सांगा-Space-and-time-you-tell

जागा आणि वेळ तुम्ही सांगा मी तिथे येते, उर्मिलाचे कंगनाला खुले आवाहन

अभिनेत्री कंगना राणावत आणि वाद हे काही नवीन समीकरण नाही. त्यात आता शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या उर्मिला मार्तोडकर हिने घेतलेल्या नव्या कार्यालयावरून कंगनाने उर्मिला मार्तोडकर हिला टोमणा मारला होता. कंगनाच्या या टीकेला उर्मिला मार्तोडकर हिने प्रतिउत्तर दिले आहे.

“तुम्ही जागा आणि वेळ सांगा, मी सगळी फ्लॅट आणि ऑफिसची डॉक्युमेंट्स घेऊन हजर होते. त्याबदल्यात तुम्ही फक्त ड्रग्ज घेणा-यांची ती यादी द्या”, अशा शब्दांत उर्मिला यांनी कंगनाला आवाहन दिले आहे. मातोंडकर यांनी अलिकडेच मुंबईत नवीन कार्यालय खरेदी केले. त्यावरुन कंगना राणावत हिने “मी एवढ्या मेहनतीने घर बांधलं तेही काँग्रेसने तोडलं. खरंच लोकं म्हणतात तसे भाजपाला साथ देऊन तर माझ्या हाती काय लागलं… तर २०-२५ कोर्ट केसेस. तुमच्याप्रमाणे मी समजदार नाही ना, नाहीतर मी पण काँग्रेसचा हात पकडला असता. किती मूर्ख आहे मी…” असं ट्विट करत उर्मिलाला लक्ष्य केले होते.

यावर उत्तर देताना मार्तोडकर यांनी व्हिडिओ शेअर केला होता. गणपती बाप्पा मोरया या कॅप्शनसह पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, “नमस्कार कंगना जी…माझ्याबद्दलचे तुमचे जे उच्च विचार आहेत ते मी ऐकले आहेत. मीच काय तर पूर्ण देशाने ते विचार ऐकलेत. आज पूर्ण देशासमोर मी तुम्हाला सांगू इच्छिते, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा…मी माझे सगळे कागदपत्र तेथे घेऊन येते. असे म्हंटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here