मागील काही दिवसांपासून ट्विटरवर उर्मिला आणि कंगना यांच्यामध्ये सुरु आहे वाद
कंगनाने उर्मिला यांना दिलेल्या रिप्लायचा स्क्रीनशॉर्ट शेअर कर रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “भाजपाला खूश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली देऊन महाराष्ट्रद्रोही असणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपाचा मुखवटा टरकावत खरा चेहरा पुढं आणल्याबद्दल कंगना रणौतचं अभिनंदनच करायला पाहिजे. या द्रोहाबद्दल भाजपाला काय शिक्षा घ्यायची ते आता राज्याची स्वाभिमानी जनताच ठरवेल,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
काय आहे या ट्विटमध्ये?
कंगनानं उर्मिला यांच्यावर टीका करताना “भाजपाला पाठिंबा देऊन मला काहीच मिळालं नाही. पण उर्मिलाला काँग्रेसमुळे खूप फायदा झाला आहे. उर्मिलाजी मी स्वत:च्या मेहनतीनं घर विकत घेतलं होतं. पण काँग्रेस ते तोडत आहे. भाजपाला खूश करुन माझ्या हातात फक्त २५-३० कोर्ट केस आल्या आहेत. मी ही तुमच्यासारखी समजूतदार असते तर काँग्रसला खूश केलं असतं,” असं म्हटलं आहे. यावरुनच रोहित पवार यांनी कंगनाने भाजपाला खुश करण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली दिली आहे असं म्हटलं आहे.
भाजपला खूश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली देऊन #महाराष्ट्रद्रोही @BJP4Maharashtra चा मुखवटा टरकावत खरा चेहरा पुढं आणल्याबद्दल @KanganaTeam चं अभिनंदनच करायला पाहिजे. या द्रोहाबद्दल भाजपला काय शिक्षा द्यायची ते आता राज्याची स्वाभिमानी जनताच ठरवेल!@UrmilaMatondkar pic.twitter.com/243kmxDGJ8
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 4, 2021