केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

केंद्रीय-मंत्री-नितीन-गड-Union-Minister-Nitin Gad

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकाळी शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली होती. आता त्या पाठोपाठ मंत्री गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. भाजपा आणि शिवसेना पक्षात ताणलेल्या संबंधामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मागच्या अनेक दिवसांपासून मेट्रो कारशेड प्रकल्प, राज्यपाल नियुक्ती आमदार, औरंगाबाद नामांतर अशा अनेक विषयांवरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांमध्ये खटके उडताना दिसून येत आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप लावले जात आहेत. यात नितीन गडकरी यांनी शिवसेना नेत्यांची आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here