Skip to content Skip to footer

नव्या कृषी कायद्याला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीवर शरद पवार यांचे ट्विट

नव्या कृषी कायद्याला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीवर शरद पवार यांचे ट्विट

नव्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे एक महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. आंदोलक आणि कृषी कायद्यांशी संबंधित सर्व प्रकरणांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत अनेक बैठकी पार पडल्या. परंतु, या बैठकींमध्ये शेतकरी आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नव्हता.

या आंदोलनावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. या निर्णयावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवारांनी ट्विट करून वक्तव्य केले आहे.

शरद पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “नव्या कृषी कायद्यांच्या अमलबजावणीला स्थगिती देण्याच्या तसंच चार सदस्यांची समिती तयार करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो. हा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा आहे”. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये ठोस चर्चा होईल अशी अपेक्षा शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचं हित लक्षात ठेवून ही चर्चा होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a comment

0.0/5