Skip to content Skip to footer

गणेश नाईक ‘शिल्पकार’ नव्हे तर ‘मिस्टर पाचटक्के, शिवसेनेची खमखमीत टीका

गणेश नाईक ‘शिल्पकार’ नव्हे तर ‘मिस्टर पाचटक्के, शिवसेनेची खमखमीत टीका

गणेश नाईक हे भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांना गद्दार म्हणतात. सायकलवरून फिरणाऱ्या गणेश नाईक यांना शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोठे केले. मात्र, नाईकांनी त्यांची साथ सोडली. त्यामुळे खरे गद्दार तुम्ही आहात, अशी जळजळीत टीका शिवसेना नेते विजय नाहटा यांनी नाईकांवर केली आहे.

रविवारी नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या मेळाव्यात नाहटा बोलत होते. यावेळी विजय नाहटा यांनी गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका केली. स्वत:ला नवी मुंबईचे शिल्पकार म्हणवून घेणाऱ्यांचा शहराच्या विकासात कुठलाही सहभाग नाही.

पुढे बोलताना नाहटा म्हणाले की, शिल्पकार घराण्याच्या बाहेर कोणालाही पद देत नाहीत. फक्त कंत्राटातून आपल्या कमिशनचे पाच टक्के घेतात. त्यामुळे गणेश नाईक यांना शिल्पकार नव्हे तर ‘मिस्टर पाचटक्के’ म्हटले पाहिजे, असे टीकास्त्र विजय नाहटा यांनी सोडले.

Leave a comment

0.0/5