पुणे मनपामध्ये भाजपचे १९ नगरसेवक बंड करण्याच्या तयारीत, वरिष्ठांचा आपल्याच नगरसेवकांवर वॉच

पुणे-मनपामध्ये-भाजपचे-१९-In Pune Municipal Corporation-BJP-19

पुणे मनपामध्ये भाजपचे १९ नगरसेवक बंड करण्याच्या तयारीत, वरिष्ठांचा आपल्याच नगरसेवकांवर वॉच

आगामी महानगर पालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १९ नगरसेवक गडबड करण्याच्या चर्चेमुळे भारतीय जनता पक्षात खळबळ उडाली आहे. हे नगरसेवक येत्या निवडणुकीत आघाडीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नगरसेवकांच्या या राजकीय हालचालींवर वरिष्ठांकडून विशेष नजर ठेवण्यात येत आहे. महापालिकेत भाजपाकडे ९९ नगरसेवकांचे संख्याबळ असून, सर्वांनाच पदे शक्य नसल्याने नाराजांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांनी बंदोबस्त सुरू केला आहे.

मागील महापालिका निवडणुकीत राज्यात सर्वत्र भाजपाचे वारे होते. त्यामुळे पुण्यात भाजपचे ९८ नगरसेवक निवडून आले. सत्ता मिळविण्यासाठी नव्या तसेच अन्य पक्षांतील आयारामांना संधी देण्यात आली. त्यामुळे अनेक जण लाटेत निवडून आले. गेल्या चार वर्षांत बहुतांश नगरसेवकांकडून प्रमुख पदे मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

मात्र, मानाच्या समजल्या जाणाऱ्या पदांवर केवळ बारा जणांना संधी मिळाली आहे. त्यामध्येही मूळ भाजपमधील आणि भाजपमध्ये नव्याने दाखल झालेल्यांमध्ये संघर्ष जोरदार उफाळून आला होता. त्याचे पडसाद महापालिकेच्या कामकाजात आणि संघटनेतही उमटू लागले असून, आगामी निवडणुकीत भाजपला बंडखोरी-पक्षांतरे रोखण्यासाठी आटापिटा करावा लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here