Skip to content Skip to footer

संसद महारत्न पुरस्काराचे महाराष्ट्रातील ‘हे’ खासदार ठरले मानकरी

संसद महारत्न पुरस्काराचे महाराष्ट्रातील ‘हे’ खासदार ठरले मानकरी

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे हे “संसद महारत्न” पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. येत्या २० मार्चला दिल्ली येथे पार पडणाऱ्या कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे. संसदेतील कामगिरीसाठी सलग पाच-पाच वेळा संसदरत्न पुरस्कार पटकावणाऱ्या खासदारांना फाउंडेशन तर्फे महारत्न पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे.

दिल्लीच्या भारत गौरव अवार्ड फाउंडेशनचा हा पुरस्कार केंद्रीय मंत्री मनसुखलाल मांडवीया यांच्या हस्ते प्रधान करण्यात येणार आहे. संसदेत सर्वाधिक प्रश्न मांडणे, संसदेत सर्वाधिक उपस्थित राहणे तसेच सर्वाधिक चर्चेमध्ये सहभागी होणे यासंदर्भात खासदार बारणे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच लोकसभेत चांगले काम करणाऱ्या टॉप ५ खासदारांमध्ये बारणे यांचे नाव आले आहे.

Leave a comment

0.0/5