प्रबोधनकार ठाकरे भट भिक्षुकशाहीला नाकारणारे मात्र कडवे हिंदुत्ववादी होते – उर्मिला मार्तोडकर

प्रबोधनकार-ठाकरे-भट-भिक्-Prabodhankar-Thackeray-Bhat-Bhik

प्रबोधनकार ठाकरे भट भिक्षुकशाहीला नाकारणारे मात्र कडवे हिंदुत्ववादी होते – उर्मिला मार्तोडकर

प्रबोधनकार ठाकरे भट भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे होते, तरीही ते सच्चे आणि कडवे हिंदुत्ववादी होते. हिंदू धर्मावरील त्यांचे प्रेम, आस्था आणि श्रद्धा ही त्यांची खरी ओळख होती. हिंदू धर्मात सांगितलेल्या बुरसटलेल्या रुढींच्या ते कट्टर विरोधात होते, अशा शब्दात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे वर्णन केले आहे. आज पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्या बोलत होत्या.

पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इतिहासात प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव नसेल, तर तो इतिहास कधीच पूर्ण होऊ शकत नाही. माफ करा मी दोन शब्दात बोलू शकत नाही कारण ते व्यक्तिमत्त्व अचाट आणि अफाट आहे. केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना वाचन आणि शिक्षणाची विलक्षण ओढ होती. ‘वाचाल तर वाचाल’ हे त्यांनी युवा पिढीला सांगितलेलं वाक्य मी नेहमी आचरणात आणते. हे वाक्य नेहमीच सत्य राहील अशा शब्दात प्रबोधनकार ठाकरे यांचा जीवनपट उघडला होता.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते अग्रणी सेनानी होते. तुरुंगवास सोसूनही मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी ते लढत राहिले. उठ मराठ्या उठ म्हणत शिवसेना पक्षाचं बारसं त्यांनी केलं. प्रत्येक शिवसैनिकाच्या पंखात वैचारिक बळ देण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळेच जिथे सामाजिक अन्याय तिथे शिवसेना हे समीकरण कायम राहिलं, असं उर्मिला म्हणाल्या.

यावेळी राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा एक किस्सा उर्मिला मार्तोडकर यांनी सांगितला. दोघेही समाजाला पुरोगामी रस्त्यावर नेणारे समकालीन नेते होते.परंतु कोल्हापुरात काही युवकांना अंबाबाईच्या मंदिरात प्रवेश नाकारल्याचं समोर आल्यानंतर ‘अंबाबाईचा नायटा’ हा शाहू महाराजांविरोधातील अग्रलेख त्यांनी लिहिला. याचं कारण कथनी आणि करणीत फरक नसावा, असं त्यांचं मत होतं. शाहू महाराजांनीही त्यांचा दुस्वास केला नाही, असे   यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here