अर्णब गोस्वामी सारखं कृत्य लष्करातल्या जवानाने केलं असतं तर त्याचं कोर्टमार्शल केलं असतं – राऊत

अर्णब-गोस्वामी-सारखं-कृत-Arnab-Goswami-like

अर्णब गोस्वामी सारखं कृत्य लष्करातल्या जवानाने केलं असतं तर त्याचं कोर्टमार्शल केलं असतं – राऊत

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल (BARC)चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता आणि आर रिपब्लिक टीव्हीच मुख्यसंपादक अर्णब गोस्वामींचे जवळपास १००० पानांचे व्हॉट्सअप चॅट मुंबई क्राईम ब्रांचने आपल्या चार्जशीटमध्ये दाखल केले होते. यामध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या बालाकोट एअर स्ट्राईकवर चर्चा झालेली दिसून आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईची माहिती अर्नब याला आधीपासून होती असे चॅटमध्ये आढळून आले आहे.

यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. केंद्रात जर आज काँग्रेसचं किंवा अन्य पक्षाचं सरकार असतं आणि भाजपा विरोधात असते त्यांनी यावरून तांडव केलं असतं असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ते आज पत्रकार माध्यमांशी बोलत होते.

अर्णब गोस्वामी यांच्यासारखी माहिती आपल्या लष्करातल्या जवानाने केली असती तर त्याचं कोर्ट मार्शल केले असते. त्याला देशद्रोही ठरवण्यात आले असते. त्याला देशाच्या सुरक्षेसाठी धोकाही मानलं असंत. आज केंद्रात काँग्रेस किंवा अन्य कोणत्या पक्षाचं सरकार असतं आणि भाजप विरोधी पक्ष असता तर त्यांनी याविषयावरून तांडव केलं असतं. परंतु आता भाजप गप्प का?, असा सवाल राऊत यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here