भाजपा नेत्याकडून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना सावध राहण्याचा समर्थकांचा सल्ला

भाजपा-नेत्याकडून-जेष्ठ-स-From BJP-leader-senior-s

भाजपा नेत्याकडून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना सावध राहण्याचा समर्थकांचा सल्ला

केंद्राने पारित केलेल्या कृषी विधेयकावरून मागच्या महिनाभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धीत येत्या ३० जानेवारीपासून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणार आहे.
मात्र अण्णा हजारेंची समजूत काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हरीभाऊ बगाडे, खासदार भागवत कराड, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांची भेट घेऊन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.

त्यात भाजपाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घ्याव्यात का, यावरून समर्थकांमध्ये मतभेद आहेत. अण्णांनी या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नये, असा एक मतप्रवाह आहे तर काही मंडळींनी भेटीचे समर्थन केले असले तरी भाजपच्या नेत्याकडून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

शुक्रवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली. अर्थात ती निष्पळ ठरली आणि हजारे आंदोलनावर ठाम राहिले. या भेटींवर हजारे यांच्या समर्थकांमध्ये मात्र चर्चा सुरू झाली आहे. दारूबंदी, व्यसनमुक्तीच्या कामाच्या निमित्ताने हजारे यांच्याशी जोडले गेलेल्या हेरंब कुलकर्णी यांनी चर्चेला तोंड फोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘भाजपाचे नेते अण्णांची भेट घेत आहेत. अण्णांनी त्यांना भेट देता कामा नये. एक तर अण्णांच्या सर्व मागण्या या केंद्राशी संबंधित आहेत त्यामुळे राज्यातील नेत्यांचा संबंध काय? दिल्लीतील केंद्रीय मंत्र्यांनी भेटायला यावे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here