आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने केला शिवसेना पक्षात प्रवेश

आणखी-एका-पोलीस-अधिकाऱ्या-Another-one-police-officer

आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने केला शिवसेना पक्षात प्रवेश

गुन्हेगारी जगतात भल्याभल्यांना घाम फोडणारे माजी पोलीस अधिकारी दिलीप जगताप यांनी राजकारणात सक्रिय प्रवेश केला आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माद्यमातून शिवसेनेच्या तिकिटावर पावणे गावातून जगताप निवडणूक लढणार आहे. जगताप यांच्या सारखा सुशिक्षित आणि प्रशाकीय चेहरा शिवसेनेच्या गोटात सामील झाल्यामुळे नक्कीच नवी मुंबईत शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे.

मागच्या विधानसभा निवडणुकापूर्वी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला होता. नालासोपारा विधानसभा मतदार संघातून ते बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. नवी मुंबईत केलेल्या विविध कारवाईमुळें जगताप यांचे नवी मुंबईत दबदबा आहे.

मूळ बारामती तालुक्याचे असलेले जगताप २०१० ते २०१३ या दरम्यान सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत होते. सेवानिवृत्ती झाल्यावर आपले आयुष्य जनसेवेसाठी घालवण्यासाठी त्यांनी समाजकार्याला प्राधान्य दिले आहे. महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीतून जगताप राजकारणात सक्रिय प्रवेश करणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here