Skip to content Skip to footer

भारतीय जनता पक्षाचा तो छुपा अजेंडा, शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांची टीका

भारतीय जनता पक्षाचा तो छुपा अजेंडा, शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांची टीका

बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका झाली होती. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संजय राऊत, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सवदी यांना चांगलेच झापले होते.

आता त्या पाठोपाठ शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार मनीषा कायदे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. कर्नाटक राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य कुटीलपणाचे असून, भारतीय जनता पार्टीचा तो छुपा अजेंडा आहे, असा आरोप आमदार मनीषा कायंदे यांनी लगावला आहे.

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडा हा त्यांचा खरा चेहरा या निमित्ताने समोर आलेला आहे. पूर्वीदेखील मुंबईला गुजरातला जोडण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आणि आता कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे, असंही मनीषा कायंदे म्हणाल्या आहेत.

Leave a comment

0.0/5