जिल्हा नियोजन बैठकीत खासदार नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात राडा

जिल्हा-नियोजन-बैठकीत-खास-District-planning-meeting-special

जिल्हा नियोजन बैठकीत खासदार नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात राडा

राज्यात शिवसेना पक्षाने सत्ता स्थापन केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र शिवसेनेवर आणि आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तसेच राणे यांच्या टीकेला शिवसैनिक सडेतोड उत्तर देतात.

त्यात आज आयोजित तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याच्या विषयावरून जिल्हा नियोजन बैठकीत भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. राणे-राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्यामुळे नंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनीही सभागृहात राडा घातला. हा वाद टोकाला गेल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांना मध्यस्थी करावी लागली होती.

तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याच्या मुद्द्यावरुन भाजप सदस्य राजन म्हापसेकर यांनी बैठकीत भूमिका मांडली. मात्र त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेचे सदस्य बाबुराव धुरी यांनी आक्षेप नोंदवला. नंतर हाच आक्षेप राणे आणि राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वादाचं कारण बणला. हा वाद नंतर टोकाला गेल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांना मध्यस्थी करावी लागली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here