मुंबई : फ्लिपकार्टवर सध्या तीन दिवसीय SAMSUNG फेस्ट चालू असून आज याचा अखेरचा दिवस आहे.
SAMSUNG च्या विविध फोन्सवर यामध्ये भरघोस सूट देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅलक्सी एस 7 तुम्ही केवळ 29 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.
फ्लिपकार्टवर या फोनची एकूण किंमत 46 हजार रुपये आहे. म्हणजेच तुम्हाला 16 हजार 10 रुपये किंमतीवर सूट मिळेल.
शिवाय एक्स्चेंज ऑफरमुळे हा लोकप्रिय फोन तुम्हाला आणखी स्वस्त किंमतीत खरेदी करता येईल. 149 रुपयांमध्ये बायबॅक गॅरंटीही खरेदी करता येईल.
SAMSUNG गॅलक्सी ऑन मॅक्सवर 2 हजार रुपयांची सूट आहे. हा फोन तुम्हाला 14 हजार 900 रुपयात खरेदी करता येईल. याशिवाय 14 हजार रुपयांची एक्स्चेंज ऑफरही देण्यात आली आहे.
गॅलक्सी ऑन 5 वर 2500 रुपये सूट आहे. 6 हजार 490 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करता येईल.
SAMSUNG Mobile फोन आणि सूट
- Galaxy ON 7- सूट 1500 रुपये, किंमत- 6990
- Galaxy ON Next- सूट 4000 रुपये, किंमत – 13 हजार 900 रुपये
- Galaxy C 9 Pro – सूट 4100 रुपये, किंमत – 29 हजार 900
- GAlaxy J 7- सूट 4100 रुपये, किंमत – 9790 रुपये