हाँगकाँग येथील टुरिंग स्पेस कंपनीने बुधवरी तीन डिस्प्ले असलेला स्मार्टफोन सादर केला असून हबलफोन असे या फोनचे नामकरण केले गेले आहे. हा स्मार्टफोन जून २०२० मध्ये बाजारात येणार आहे. हा फोन ५ जी सपोर्ट करेल त्याचबरोबर टू जी, ३ जी, ४ जी लाही सपोर्ट करेल. या फोनसाठी २७५० डॉलर्स म्हणजे १ लाख ८८ हजार रु. मोजावे लागणार असून हि किंमत वाढू शकते असे जाहीर केले गेले आहे.
या फोनला ३ डिस्प्ले बरोबर ६ कॅमेरे असून त्यातील प्रायमरी कॅमेरा ६० एमपीचा आहे तर बाकी १२ एमपीचे आहेत. या फोनला ३३०० आणि २८०० एमएएचच्या दोन बॅटरीज आहेत. कॅमेरे फोन मध्ये विविध जागी आहेत. या फोनचा व्हिडीओ यु ट्यूबवर पोस्ट केला गेला आहे. फोनला स्नॅपड्रॅगन ८५५ हा पॉवरफुल प्रोसेसर आणि अँड्राईड पी ओएस दिली जाणार आहे.
विडिओ पहा :
या फोनचा पहिला स्क्रीन ११.८१ इंची आहे तर बाकी दोन ५.४४ आणि ५.४१ इंची आहेत. त्याला ८ + ८ जीबी रॅम, २५६ + २५६ जीबी मेमरी, ड्युअल सीम, फिंगरप्रिंट सेन्सर अशी अन्य फिचर असून हा फोन वॉटर आणि डस्टप्रुफ आहे असून टचस्क्रीन डिस्प्ले सह आहे.