Skip to content Skip to footer

.तर फेसबुक बंद होणार!

राजकीय पक्षांच्या डेटामध्ये हेराफेरी, पाच कोटी युजर्सचे डेटा लीक प्रकरण, अंकाऊट हँकिंग यासारख्या प्रकरणांमुळे सोशल मिडीयावरील लोकप्रिय माध्यम फेसबुक सध्या अडचणीत आले आहे. डेटा लीक प्रकरणी फेसबुकला माफीही मागावी लागली होती. तसेच युजर्सच्या डेटाच्या सुरक्षेचे आश्वासनही त्यांनी दिले होते. मात्र, ही प्रकरणे अशीच सुरू राहिली तर मार्क झुकेरबर्ग यांनी सुरु केलेले आणि लोकप्रिय झालेले सोशल मिडीयाचे फेसबुक हे माध्यम लवकरच बंद होईल असे भाकीत 2010 मध्येच वर्तवण्यात आले होते. फेसबुक आता अडचणीत आले असताना हे भाकीत मात्र आठ वर्षापूर्वीच वर्तवण्यात आले होते. डेव्हिड कर्कपेट्रीक नावाच्या लेखकाने फेसबुकबाबत लिहिलेल्या पुस्तकात हे भाकीत वर्तवण्यात आले होते.

फेसबुकच्या डेटा लीक आणि सुरक्षेबाबत अशाच समस्या येत राहिल्या तर फेसबुकच्या अडचणी आणखी वाढतील असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अशा प्रकरणांमुळे फेसबुकची विश्वासार्हता कमी होईल, त्यामुळे साहजीकच त्यांच्या जाहिरातीही कमी होतील. त्यामुळे फेसबुक लवकरच बंद होईल असे सांगतानाच तज्ज्ञांनी या पुस्तकातील भाकीताचा दाखला दिला आहे. 2012 मध्ये फेसबुकने इंस्टाग्राम विकत घेतले होते तेव्हा तो मोठा जुगार मानला जात होता. इंस्टाग्रामच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित करण्यात येत होत्या. मात्र, आता फेसबुकपेक्षा व्हॉटसअॅप आणि इंस्टाग्रामचा वापर वाढला आहे.

फेसबुकने आता युजर्सच्या डेटाच्या सुरक्षेसाठी काही पावले उचलली आहेत. तसेच फेसबुक वेळोवेळी युजर्सला फायदा व्हावा यासाठी नवनवीन फिचर्स आणत असतात. आपल्या अॅपमध्ये आणि साइटमध्येही ते बदल करत असतात. त्यातील अनेक अॅप उपयोगाचे आहेत. आपत्कालीन स्थितीत संपर्क साधणे, हवामान बदल, रक्तपेढी, एखाद्या संस्थेशी जोडणे, फेसबुकवरून रिचार्ज सुविधा, मल्टिपल डिलीट सुविधा, टॅग आणि पोस्ट रिमूव्ह, लाइव्ह व्हिडिओ यासारख्या फिचर्समुळे फेसबुक आपली लोकप्रियता टिकवून आहे. मात्र, डेटा सुरक्षेचा मुद्दा त्यांना अडचणीत आणू शकतो. अनेक जाहिरातदार आतापासूनच इंस्टाग्राम आणि व्हॉटसअॅपकडे वळत आहे. त्यामुळे फेसबुकला स्पर्धेत टिकायचे असेल तर जाहिरातदार आणि लोकप्रियचा टिकवण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5