Skip to content Skip to footer

फ्लिपकार्ट चा मोबाईल बोनान्झा सेल सुरू : जाणून घ्या ऑफर्स

फ्लिपकार्ट वर आजपासून चार दिवसीय मोबाईल बोनान्झा सेल सुरू झाला असून यात विविध मॉडेल्सवर अतिशय आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत.

दिपावलीच्या कालखंडात सर्व शॉपींग पोर्टल्सवर सेल आयोजित करण्यात आले होते. सर्वच शॉपींग पोर्टल्सने या कालखंडात दणदणीत बिझनेस केल्याची माहितीदेखील समोर आली होती. यानंतर आता फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवर मोबाईल बोनान्झा सेल आयोजित करण्यात आला आहे. १९ ते २२ नोव्हेंबरच्या दरम्यान हा सेल होणार आहे. नावातच नमूद असल्यानुसार फक्त स्मार्टफोन युजर्ससाठी हा सेल होणार असून यात विविध मॉडेल्सवर आकर्षक सवलती दिल्या आहेत. यात विविध मॉडेल्ससाठी नो-कॉस्ट इएमआयची सुविधा देण्यात आलेली आहे. एचडीएफसीसह अन्य बँकांच्या कार्डवरून खरेदी करणार्‍या ग्राहकांना कॅशबॅकदेखील मिळणार आहे. तर विविध मॉडेल्ससाठी कंप्लीट मोबाईल प्रोटेक्शन प्लॅनदेखील यात उपलब्ध करण्यात आले आहेत.

यासोबत मोबाईल बोनान्झा सेलमध्ये विविध प्रॉडक्टवर घसघशीत सवलती देण्यात आल्या आहेत. शाओमीचा रेडमी ५ प्रो हा लोकप्रिय स्मार्टफोन या सेलदरम्यान १३,९९९ रूपये मूल्यात मिळणार आहे. शाओमीचीच मालकी असणार्‍या पोको कंपनीच्या पोको एफ१ या मॉडेलवर एक हजार रूपयांची सवलत मिळणार आहे. तर जुन्या मोबाईलला एक्सचेंज केल्यास दोन हजार रूपयांची अतिरिक्त सवलत देण्यात येणार आहे. ऑनर ९ एन या लोकप्रिय मॉडेलवरही डिस्काऊंट मिळणार असून याचे ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेजचे मॉडेल ९,९९९ रूपये मूल्यात मिळणार आहे. असुसच्या झेनफोन मॅक्स प्रो एम१ या मॉडेलवरही डिस्काऊंट मिळणार असून याचे ३ व ६ जीबी रॅमचे व्हेरियंट हे अनुक्रमे ९,९९९ आणि १०,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. ऑनर ७ ए या मॉडेलवर एक हजारांची सवलत मिळून हा स्मार्टफोन ७,९९९ रूपयात मिळणार आहे. गुगलचा पिक्सेल२ एक्सएल हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन ४०,९९० रूपयात मिळणार आहे. विवो एक्स २१ या मॉडेलवर तब्बल ४ हजारांची सवलत असून हा स्मार्टफोन सेलदरम्यान ३१,९९० रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे. तर ओप्पो एफ९ हे मॉडेल एक हजार रूपयांनी स्वस्त म्हणजेच १८,९९० रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5