ऑगस्ट २०: आज सकाळी ९ वाजून २ मिनिटांनी चांद्रयान-२ ने चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला असल्याची
माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था इसरो चे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी बंगळुरू येथे घेतलेल्या पत्रकार
परिषदेत दिली. चांद्रयानाने एक महत्वाचा टप्पा पार केला असल्याचे त्यांनी सांगितले.
७ सप्टेंबरला रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी चांद्रयान-२ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल आणि २ सप्टेंबरला लॅण्डर
ऑर्बिटरमधून वेगळे होण्याची महत्वाची प्रक्रिया होईल अशीही माहिती डॉ. सिवन यांनी दिली.
चांद्रयान-२ ही भारताची दुसरी चांद्रमोहीम आहे. २२ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून चांद्रयान-२ चे यशस्वी प्रक्षेपण एक
ऑर्बिटर, लॅण्डर 'विक्रम' आणि 'प्रग्यान' रोव्हर यांच्यासहित करण्यात आले होते. यशस्वी लँडिंग झाल्यानंतर असे
करणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीन नंतर जगातील ४ था देश ठरेल.
यापूर्वी चांद्रयान-१ ही भारताची पहिली चांद्रमोहीम ऑक्टोबर २००८ मध्ये केली गेली होती
चांद्रयान-२ ने चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला
ads