लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp कडून सातत्याने नवनवे फीचर्स आणले जातात. यावर्षी फिंगरप्रिंट लॉक, ब्लॉक कॉन्टॅक्ट्स, मीडिया हाइड आणि स्टेटस प्रायव्हसी यासारख्या अनेक नवे फीचर्स आणल्यानंतर व्हॉट्सअॅप अजूनही बर्याच नव्या फिचर्सवर काम करत आहे. पुढील वर्षी हे फीचर्स युजर्सना वापरायला मिळू शकतात. यामध्ये डार्क मोड, फेस अनलॉक, डिसअॅपिअरिंग मेसेज, लास्ट सीन फॉर सिलेक्टेड फ्रेंड्स आणि फेसबुक पे यांसारख्या फीचर्सचा समावेश असण्याची शक्यता आहे.
डार्क मोड –
व्हॉट्सअॅप युजर्स बर्याच दिवसांपासून डार्क मोडची वाट पाहत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून हे फीचर डेव्हलपमेंट मोडमध्ये आहे. बीटा व्हर्जनमध्ये डार्क मोड तीन पर्यायांसह मिळेल. डार्क मोडमध्ये बॅकग्राउंड ब्लॅक रंगाचे होईल तर टेक्स्ट व्हाइट रंगात दिसतील.
फेस अनलॉक –
फिंगरप्रिंटच्या मदतीने चॅटिंग सुरक्षित करण्याचा पर्याय दिल्यानंतर पुढच्या वर्षी व्हॉट्सअॅप फेस अनलॉक फीचर आणायची दाट शक्यता आहे. मात्र, हे फीचर नेमके केव्हा सुरू होईल याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही.
डिसअॅपिअरिंग मेसेज –
कंपनी एक विशेष अपडेट आणायच्या तयारीत असून याद्वारे युजरने सेंड किंवा रिसिव्ह केलेले मेसेज युजरने निश्चित केलेल्या मर्यादेनंतर ‘गायब’ होतील. हे फीचर सुरूवातीला केवळ ग्रुप अॅडमीन वापरु शकतील असं सांगितलं जातंय.
लास्ट सीन फॉर सिलेक्टेड फ्रेंड्स –
आपल्या कॉन्टॅक्ट्सने मेसेज केव्हा चेक केला हे व्हॉट्सअॅप युजर्स पाहू शकतात. हे लपवण्याचा एक पर्यायही उपलब्ध आहे पण असे केल्याने वापरकर्ते उर्वरित लोकांचे लास्ट सीन पाहू शकत नाहीत. रिपोर्ट्सनुसार, पुढील वर्षी व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सना काही फ्रेंड्ससाठी लास्ट सीन पर्याय सुरू करण्याचा पर्याय देऊ शकतो.
फेसबुक पे –
व्हॉट्सअॅपने हे फीचर आधीच सादर केलं होतं पण अद्याप सर्वांसाठी हे फीचर सुरू करण्यात आलेलं नाही. मात्र, पुढील वर्षी हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध केलं जाण्याची शक्यता आहे.