हैदराबाद – ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी- 20 मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय संघासमोर एकदिवसीय मालिका जिंकून विश्वचषकासाठीचा संघ तयार करण्याचे मोठे आव्हान आहे. आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांसाठी समोरासमोर येतील.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना हैदराबाद येथे थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला असून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.