Skip to content Skip to footer

गेल्या दोन वर्षांत ४६३ गोलंदाजांना जे जमलं नाही ते कुलदीपने करुन दाखवलं

रांची | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारित ५० षटकांत ५ बाद ३१३ धावा केल्या. यात उस्मान ख्वाजाने वयाच्या ३२व्या वर्षी वनडे कारकिर्दीतील पहिले शतकं केले.

आता भारतीय संघासमोर ५० षटकांत ३१४ धावांचे मोठे आव्हान आहे.

गोलंदाजीत मोठा पराक्रम-

आजच्या सामन्यात भारताकडून कुलदीप यादव सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १० षटकांत ६४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. अन्य गोलंदाजांत केवळ मोहम्मद शमीला १ विकेट मिळाली. जेव्हा आज कुलदीपने शाॅन मार्शला बाद केले तेव्हा त्याची ही गेल्या दोन वर्षातील ८४ वी विकेट होती.

याबरोबर कुलदीप गेल्या दोन वर्षात सर्वाधिक विकेट्स (८५) घेणारा अव्वल गोलंदाज बनला आहे. यापुर्वी हा विक्रम राशिद खानच्या नावावर होता. राशिदने गेल्या दोन वर्षात ३५ सामन्यात ८३ विकेट्स घेतल्या आहेत. तर कुलदीपने ४२ सामन्यात ८५ विकेट्स घेतल्या आहेत.

गेल्या दोन वर्षांत वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-

८५- कुलदीप यादव, सामने- ४२

८३- राशिद खान, सामने- ३५

७४- आदिल राशिद, सामने- ४३

६५- युझवेंद्र चहल, सामने- ३७

६०- ट्रेंट बोल्ट, सामने- ६०

Leave a comment

0.0/5