Skip to content Skip to footer

एमएस धोनी पाठोपाठ हा खेळाडूही मोहाली वनडेतून बाहेर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील उर्वरित दोन वनडे सामन्यांसाठी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. पण त्याचबरोबर मोहम्मद शमीही चौथ्या वनडे सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

याबद्दल भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी सुचीत केले आहे. ते शमीबद्दल म्हणाले, ‘शमीच्या पायाला थोड्या वेदना आहेत. त्यामुळे आम्हाला तो चौथ्या सामन्यासाठी फिट आहे की नाही हे तपासावे लागेल. जर तो फिट नसेल तर भुवनेश्वर कुमारला संघात संधी मिळेल.’

त्याचबरोबर धोनीबद्दल बांगर म्हणाले, ‘उर्वरित दोन सामन्यामध्ये धोनी खेळणार नाही. त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम 11 जणांच्या संघात पुढिल सामन्यात बदल दिसेल.’

त्यामुळे शुक्रवारी झालेला हा सामना धोनीचा विश्वचषकाआधीचा भारतातील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी भारताच्या 11 जणांच्या संघात बदल होऊ शकतात याबद्दल भारताचा कर्णधार एमएस धोनीने कल्पना दिली आहे. त्याने म्हटले आहे की ‘आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी देऊ. त्यांनी त्याचा फायदा घ्यायला हवा. कारण विश्वचषक जवळ येत आहे आणि सर्वांना संघात जागा हवी आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध उर्वरित चौथा आणि पाचवा वनडे सामना अनुक्रमे 10 आणि 13 मार्चला मोहाली आणि दिल्ली येथे होणार आहे.

Leave a comment

0.0/5