Skip to content Skip to footer

बीसीसीआयकडून खेळाडूचे तीन महिन्यांसाठी निलंबन, भारतीय संघातून बाहेर

आज विश्वचषकाला सुरुवात झाली आणि त्याच दिवशी  बीसीसीआयने एका खेळाडूचे तीन महिन्यांसाठी निलंबन केले आहे. विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी कारवाई केल्यामुळे  बीसीसीआय चर्चेत आहे. बीसीसीआयने ही कारवाई केल्यामुळे त्याला भारतीय संघातील स्थानही गमवावे लागले आहे.

नेमके प्रकरण काय
भारताचा एक क्रिकेटपटू अबुधाबी येथे झालेल्या एका ट्वेन्टी-20 लीगमध्ये खेळला होता. या लीगमध्ये खेळण्यापूर्वी खेळाडूने बीसीसीआयची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे बीसीसीआयने ही कडक कारवाई केल्याचे म्हटले जात आहे.

बीसीसीआय काय म्हणते
जर एखाद्या खेळाडूला देशाबाहेर जाऊन कोणत्याही स्पर्धेत खेळायचे असेल, तर त्याला बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागते. जर एखादा खेळाडू परवानगी घेऊन खेळला तर त्याच्यावर कडक कारवाई आम्ही करतो. तीन महिन्यांची निलंबनाची कारवाई आम्ही यावेळी करत आहोत.

कोण आहे हा खेळाडू
हा खेळाडू आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. त्याचबरोबर भारताच्या ‘अ’ संघाकडूनही हा युवा खेळाडू खेळला आहे. हा खेळाडू आहे रिंकू सिंग. भारत आणि श्रीलंका यांच्यातील ‘अ’ संघांमध्ये आजपासून सामना खेळवण्यात येणार होता. पण या निलंबनामुळे रिंकूला या सामन्यात खेळता येणार नाही.

Leave a comment

0.0/5