आयपीएल पाठोपाठ संघांचे सर्व शिबीर ही पुढे ढकलले.

आयपीएल-पाठोपाठ-संघांचे-स-IPL-chase-teams-C

आयपीएल पाठोपाठ संघांचे सर्व शिबीर ही पुढे ढकलले.

कोरोना या महारोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल पुढे दाखविण्यात आल्याचे वृत्त ताजेच असताना सरावासाठी विविध संघांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये सर्व शिबिरे आयोजित केली होती. परंतु सध्या देशात कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असलेले पाहून संघांनी सराव शिबिरे रद्द करून पुढे ढकलल्याचा वृत्त हाती आली आहे. तसेच बीसीसीआय व आयपीएल कमिटीने याबाबतीत संघांना सूचना देखील केल्याचे कळत आहे.

बंगरुळु, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता टीमने त्यांचे सराव शिबीर मंत्रालयाच्या आरोग्य विभागाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, बंगरुळु संघाने त्यांच्या ट्विटर हॅन्डलवरून याबाबतीत माहिती दिली आहे. तसेच बीसीसीआयने देखील खेळाडूंना घरी राहण्याचे सुचविले असून आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here