दुर्दैवी! करोनामुळे मूळ भारतीय असलेल्या ज्येष्ठ क्रीडापटूचे निधन

र्दैवी! करोनामुळे मूळ भारतीय-God bless you! Corona is a native Indian

करोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यातच क्रीडा विश्वातून एक वाईट बातमी आली आहे. मूळचे भारतीय असलेले मॅरोथॉन धावपटू अमरिक सिंग यांची करोनाशी झुंज अपयशी ठरली. अमरिक यांनी गुरुवारी (२३ एप्रिल) बर्मिंगहमच्या सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ८४ वर्षांचे होते.

अमरिक सिंग हे १९७० साली भारत सोडून ग्लास्गोमध्ये आले. अमरिक सिंग हे अनेक वर्षे ग्लास्गो येथे वास्तव्यास होते. एक यशस्वी उद्योजक असलेले अमरिक सिंग यांनी मॅरेथॉन धावपटू म्हणूनही नाव कमावले. त्यांनी ५६० पेक्षाही अधिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. “अमरिक यांना अखेरचा प्रणाम. तुम्ही जगातून गेला असाल तरी तुम्हाला कोणीही विसरणार नाही. तुम्ही केलेल्या कार्याच्या आणि समाजसेवेच्या तुलनेत मला थोड्या अंशी तरी गरजूंची सेवा करता यावी माझी इच्छा आहे. आम्ही सारेच तुमच्यावर शेवटपर्यंत किती प्रेम करायचो हे तुम्हाला माहितीच आहे”, अशा शब्दात अमरिक सिंग यांचा नातू पमन सिंग याने त्यांना आदरांजली वाहिली.

गरजूंची सेवा करण्यासहित अमरिक सिंग स्वत:ची आवड म्हणून धावपटूही बनले. त्यांनी ६५० हून अधिक धावण्याच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. चाळीशीनंतर त्यांनी धावपटू बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते स्वप्न पूर्ण केले. त्यांनी अनेक मॅरेथॉन आणि हाफ-मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्यांनी २६ वेळा लंडन मॅरेथॉनमध्येही सहभाग घेतला होता. जगभरातील अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये त्यांनी स्पर्धक म्हणून हजेरी लावली. निवृत्तीनंतरदेखील वयाच्या ८० व्या वर्षी ते सकाळी सहा वाजता कसरत आणि ट्रेडमीलवर व्यायाम करायचे. त्यानंतर ते गुरूद्वारामध्ये गरजूंची सेवा करण्यासाठी जायचे, अशी माहिती पमन यांनी इतर ट्विट्सच्या माध्यमातून दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here