कोलकात्याची विजयी घौडदौड रोखण्यास चेन्नईचे सुपरकिंग्ज सज्ज.
यंदाच्या आयपील हंगामात चेन्नई संघाकडून अपेक्षित असलेली मोठी कामगिरी बघायला मिळाली नाही. तसेच अनेक प्रमुख खेळाडूंनी माघार घेतल्याने चेन्नई संघाला मोठे नुकसान भोगावे लागत आहे. चेन्नई संघाने आजपर्यंतच्या आयपीएल मध्ये सर्वात निकृष्ट कामगिरी या हंगामात केल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आज कोलकत्ता सारख्या प्रबळ संघाविरुद्ध चेन्नई विजय मिळवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महेंद्रसिंग धोनीचे दमदार नेतृत्व असूनही चेन्नई यंदा अंकतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. त्यामुळे चेन्नई संघाकडून पूर्वीप्रमाणे दमदार कामगिरी व्हावी, अशी चाहत्यांची इच्छा आहे.
आजपर्यंत चेन्नई आणि कोलकाता संघ २२ सामन्यात एकमेकांसमोर आले असून, त्यात १३ वेळेस चेन्नई तर ०८ वेळेस कोलकत्ता संघ विजयी झाला आहे. परंतु आजचा सामना कोलकत्ता संघासाठी प्लेऑफ मध्ये स्थान मिळवण्यासाठी महत्वाचा असून, चेन्नई संघ प्रतिष्ठा राखण्यासाठी हा सामना खेळणार आहे.