डेफिनीटली नॉट! ; महेंद्रसिंह धोनीच्या उत्तराने टीका करणाऱ्यांना बसली चपराक.
एम. एस. धोनीने जशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तशीच त्याने आता आयपीएल मधूनही निवृत्ती घ्यावी, त्याचा खेळ पूर्वी सारखा राहिला नाही, अशा चर्चा अनेकदा प्रसिद्ध होत असतानाच धोनीने या सर्व टीकाकारांना जोरदार उत्तर दिले आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात धोनीचा परफॉर्मन्स आणि त्याचं नेतृत्व कमजोर झाल्याचे अनेकदा बोलले जात होते.
त्यावरूनच पंजाब आणि चेन्नई यांच्यातील सामन्यापूर्वी टॉस दरम्यान समालोचक असलेल्या न्यूझीलंडच्या डॅनी मॉरिसने धोनीला एक प्रश्न विचारला. “पिवळ्या जर्सी मध्ये हा तुझा शेवटचा सामना असू शकतो का?”, असे त्याने धोनीला विचारले. त्यावर धोनीने त्यांच्या कॅप्टन कुल अंदाजात उत्तर दिले. “डेफिनीटली नॉट!”, असे म्हणत मी पुढचा आयपीएल देखील खेळणार असल्याचे धोनीने जाहीर केले.