चहलच्या होणाऱ्या पत्नीचा अनुष्का शर्माच्या ‘क्युटी पाय’ गाण्यावर भन्नाट डान्स

चहलच्या-होणाऱ्या-पत्नीचा-Of the wandering-to-be-wife
ads

तुम्ही पाहिलात का तिचा खास डान्स?

IPLचा १३वा हंगाम मोठ्या जल्लोषात खेळला गेला. स्पर्धेत अनेक अनुभवी आणि नव्या दमाच्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने साऱ्यांना खुश केले. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल यानेदेखील आपल्या फिरकी गोलंदाजीने चाहत्यांना आनंदित केले. IPL संपवल्यानंतर आता तो यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत कधी लग्नाच्या बेडीत अडकणार याची सर्वत्र चर्चा रंगल्याचे दिसत आहे. धनश्री दुबईला IPLच्या सामन्यांना हजेरी लावताना दिसली. पण IPL संपल्यानंतर युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आणि धनश्री पुन्हा भारतात परतली. पण सध्या धनश्री तिच्या एका डान्समुळे प्रचंड चर्चेत आहे.

धनश्रीने आपल्या इन्स्टाग्रांम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ती एका स्टु़डिओमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत ए दिल है मुश्किल या हिंदी चित्रपटातील ‘क्युटी पाय’ गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. तिच्या या डान्सचं फॅन्सकडून प्रचंड कौतुक केलं जात आहे. लग्नात होणाऱ्या या डान्सच्या ऊर्जेला तुम्ही टक्कर देऊ शकाल असं वाटतंय का? असा सवाल तिने चाहत्यांना कॅप्शनमधून केला आहे. तसंच, आतापर्यंतचे डान्स व्हिडीओ हे तिचे एकटीचे असायचे पण या डान्सचा व्हिडीओमध्ये दोन सहकाऱ्यांसोबत नृत्य करताना आनंद वाटला, असंही तिने लिहिलं आहे. विशेष म्हणजे तिच्या या व्हिडीओवर होणारा नवरदेव युजवेंद्र चहल यानेही ‘व्वा’ अशी कमेंट करून खूप सारे प्रेम व्यक्त करणारे इमोजी वापरले आहेत.

 

दरम्यान, धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबर पैकी एक मानली जाते. तिच्या यू-ट्युब चॅनलचे २ मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला होता. लॉकडाउन काळात चहल घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होता. अनलॉक काळात चहलने सरावासाठी सुरुवात केली होती पण टीक-टॉकच्या व्हिडीओमुळे तो अधिक चर्चेत असायचा. असं असताना अचानक एक दिवस त्याने धनश्रीशी साखरपुडा केल्याची बातमी दिली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here