Skip to content Skip to footer

आता ‘अजिंक्य’ रहाण्याशिवाय पर्याय नाही; पाहा काय सांगतेय आकडेवारी

मेलबर्न मैदानावर भारताचं कसं आहे प्रदर्शन?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान शनिवार, २६ डिसेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या पराभवातून सावरत भारतीय संघ मैदानात उतरेल. चार कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं १-० ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत पुनरागमन करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली मायदेशी परतला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून विराट कोहलीनं ७४ धावांची खेळी केली होती. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. पहिल्या कसोटी मालिकेत मोहम्मद शमीही दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे शमी मायदेशी परतला आहे. विराट कोहली आणि मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कसोटी मालिकेत कसं पुनरागमन करतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मेलबर्न मैदानावर भारताचं कसं आहे प्रदर्शन?
विराट कोहली आणि शमीच्या अनुपस्थितीत कसोटी मालिकेत पुनरागमन करण्याचं मोठं आवाहन असणार आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानवर भारतीय संघानं आतापर्यंत १३ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये ८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर फक्त तीन सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला. दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत. ऑस्ट्रेलिया वगळता इतर संघाच्या तुलनेत भारतीय संघाचा हा विक्रम चांगला आहे. त्यामुळेच मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतीय संघ पुनरागमन करु शकतो.

२०१८ मधील विजय –
२०१८ मध्ये भारतीय संघानं मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या सामन्यात चेतेश्वर पुजारानं दमदार शतकी खेळी केली होती. त्यामुळेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत पुजारावरील जबाबदारी वाढली आहे.

दुसऱ्या कसोटीत बुमराहाचा रोल महत्वाचा –
मेलबर्न मैदानावर झालेल्या मागील दोन्ही सामन्यात भारतीय संघानं विजय मिळवला आहे. २०१८ मध्ये भारतीय संघानं या मैदानावर विजय मिळवला होता. या सामन्यात बुमराहची भूमिका महत्वाची होती. या सामन्यात बुमराहनं ९ विकेट मिळवल्या होत्या. त्यामुळे २६ डिसेंबर रोजी होणाऱ्या कसोटी सामन्यात बुमराहची भूमिका महत्वाची ठरणार आहे….

२०१४ मध्ये रहाणेचं शतक –
मेलबर्न येथे २०१४ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेनं शतकी खेळी केली होती. हा सामना अनिर्णीत राहिला होता. या सामन्यात रहाणे आणि विराट कोहलीनं दमदार प्रदर्शन केलं होतं. रहाणेने पहिल्या डावांत शतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या डावांत ४८ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेला कर्णधाराला साजेशी खेळी करावी लागणार आहे.

Leave a comment

0.0/5