चेन्नई कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनची अष्टपैलू कामगिरी

चेन्नई येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड या दुसऱ्या कसोटी सामन्यात आर. अश्विनने आज तिसऱ्या दिवशी शतक झळकावून अष्टपैलू कामगिरी करून दाखवली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघ या दुसऱ्या कसोटी सामन्यात मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना १३४ इतकीच धावसंख्या उभारू शकला. याचे श्रेय भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ठ कामगिरीस जाते. अश्विनने एकट्याने ५ फलंदाजांना बाद करत इंग्लंडच्या अर्ध्या संघाला तंबूत माघारी धाडले. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला जास्त धावसंख्या उभारता आली नाही.

त्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावासाठी फलंदाजी करण्यासाठी आल्यावर भारतीय फलंदाजही मोठी धावसंख्या न उभारता बाद होत होते, तेव्हा कर्णधार विराट कोहालीसह अश्विनने ९६ धावांची भागीदारी केली. विराट ६२ धावा करून बाद झाल्यावर अश्विनने एका बाजूने खिंड लढवत धावा काढणे सुरूच ठेवले. अश्विनने १४८ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकारासह १०६ धावा काढल्या व बाद झाला.

अश्विनच्या या अष्टपैलू कामगिरीने या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. इंग्लंडला जिंकण्यासाठी ४८२ धावांची गरज आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here