IND VS ENG: सूर्यकुमार यादव केएल राहुलची जागा घेणार? जाणून घ्या भारताची संभाव्य ‘Playing 11’

महाराष्ट्र बुलेटिन : करो या मरो… टीम इंडियासाठी गुरुवारी होणारा चौथा टी-२० सामना काही अशाच प्रकारचा आहे. भारतीय संघ (India vs England, 4th T20I) मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे. आता पराभवाला सामोरे जाणे म्हणजे मालिका गमावणे. अशा परिस्थितीत टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत चौथा टी-२० सामना जिंकण्यासाठी स्वतःला झोकून देईल. आता प्रश्न असा आहे की भारतीय टीम कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरेल. मागील ३ टी-२० सामन्यांमध्ये करण्यात आलेल्या बदलांनी सर्व एक्सपर्ट्स आणि चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते आणि आता चौथ्या टी-२० सामन्यात प्लेइंग इलेव्हन कोणती असेल याचा अंदाज लावणे देखील कठीण आहे.

तसे तर तिसऱ्या टी-२० सामन्यातील प्रदर्शन आणि चौथ्या टी-२० सामन्याचे महत्व लक्षात घेता टीम इंडिया कठोर निर्णय घेऊ शकते. जसे की ३ सामन्यांमध्ये केएल राहुलने फक्त १ रन बनविला, त्यामुळे साहजिक आहे की राहुल सध्या फॉर्मात नाही. त्यामुळे राहुलला बाहेर करून सूर्यकुमार यादवला संघात स्थान मिळू शकते. दुसर्‍या टी-२० मध्ये पदार्पण केल्यानंतर न खेळताच सूर्यकुमारला तिसर्‍या टी-२० मधून बाहेर करण्यात आले होते.

कोणत्या संघासह मैदानात उतरेल टीम इंडिया?

केएल राहुलच्या जागी टीम इंडिया पुन्हा एकदा ईशान किशनला खेळवणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. रोहित शर्मा त्याचा सलामीचा साथीदार असेल. यानंतर विराट कोहली तिसर्‍या क्रमांकावर खेळेल. त्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर खेळू शकेल. सूर्यकुमार यादवला सहाव्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते. सातव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या आणि त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर असतील. शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल यांचे स्थान निश्चित मानले जात आहे. जर युजवेंद्र चहलच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली तर गोलंदाजी आणखी मजबूत होऊ शकते कारण तीनही टी-२० सामन्यांमध्ये चहल काही खास कामगिरी करू शकलेला नाही.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा, ईशान किशन, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here