राज्यातील ३३ जिल्ह्यातील एक लाख ७८ हजार जनावरांना लम्पी चर्मरोगाची बाधा झाली होती. मात्र वेगाने १०० टक्के लसीकरण झाल्याने पशुधनाच्या मृत्यूदरावर नियंत्रण राखता आले, तसेच सप्टेंबर २०२३ पर्यंत लसीकरणात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार असून ही लस आता राज्यातच तयार होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य रणजितसिंह मोहिते…