सध्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची या स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या निर्णयापाठोपाठ वाघोलीबाबत होऊ लागलेली मागणी अततायी आहे. वाघोलीचे नागरीकरण व औद्योगीकरण ज्या वेगाने होत आहे, ते पाहता वाघोली गाव हे पुणे महापालिकेत असणेच नागरीहिताचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केले आहे.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरुवातीला ११ आणि त्यानंतर २३ गावांचा समावेश टप्प्याटप्प्याने महापालिकेत…