सातारा : देशभरातील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या महाबळेश्वरातील वेण्णा लेक ला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. काल रात्री काही स्थानिक वेण्णा लेक परिसरात गेले असता हा गंभीर प्रकार उघडकीस आला.
वेण्णा लेकच्या गळतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या धरणातून महाबळेश्वर-पाचगणीसह सुमारे 25 गावांना पाणीपुरवठा केला जातो.
2001 मध्ये 56 कोटी रुपये खर्चून वेण्णा लेक बांधण्यात आले आहे.
https://maharashtrabulletin.com/chitale-bandhu-salaru-hike/
वेण्णा लेक हे सध्या महाबळेश्वर गिरीस्थान यांच्या ताब्यात आहे.
महाबळेश्वर गिरिस्थानच्या मुख्याधिकारी अमिता पाटील यांनी वेण्णा लेकला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
याबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांना कळविण्यात आलं असून ते वेण्णा लेक भेट देणार आहेत.