गिझाच्या पिरॅमिड बद्दल जगभर अतीव उत्सुकता असते. लालसर तांबूस दगडांनी बांधलेली ही आकाशाकडे निमुळती होत जाणारी वास्तू लाखो पर्यटकानाच नव्हे तर इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांनादेखील अचंबित करत आली आहे. पिरॅमिड बांधून हजारो वर्षे झाली असतील पण अजूनसुद्धा ह्या वस्तू का, कोणी व कश्या बांधल्या यावर मात्र सतत नवनवीन तर्क बांधले जात आहेत. राजाच्या मृत शरीराला जतन करून त्याच्या भावी(?) प्रवासा साठी लागणाऱ्या सामुग्रीचा साठा करण्यासाठी याची उभारणी झाली हा सर्वसामान्य समज. पण काहींच्या मते ही सारी धान्याची कोठारे होती तर काहीच्या मते विजेची जनरेटर्स..
पिरॅमिड बद्दल ज्या अनेक समजुती प्रचलित आहेत त्यापकी 5 समजुती आम्ही गोळा केल्या आहेत.. जरूर वाचा.
1. स्पिंक्सच्या जमिनीखाली अंतराळ यान :
पिरॅमिड चा अभ्यास करण्याच्या हेतूने शेकडो संशोधकांनी अक्षरशः दिसेल त्या अन मिळेल त्या वस्तू चाळल्या. दगड अन दगड, भिंती अन भिंती चेक केल्या. अशाच एका मोहिमेत सापडले ते थोथ (thoth) या अर्ध मानव वजा देवाने लिहिलेले ग्रंथ. थोथ ज्याला इजिप्तमध्ये देहूती या नावानेसुद्धा ओळखले जाते तो एक मानव होता ज्याचे धड माणसाचे व डोके बबूनचे होते. दैवी शक्ती असलेल्या या थोथची चित्रे पिरॅमिडच्या मुख्य चेम्बर्सच्या बाहेरील भिंतीवर दोन्ही बाजूला आहेत. शोधकर्त्यांना काही पुरातन हस्त लिखिते मिळाली आहेत जी याच थोथने लिहलेली आहेत असा समज आहे. अन याच लिखीतात एक कविता आहे जी सुचवते की स्पिंक्स जवळील जमिनी खाली रेडी अवस्थेत एक अंतराळयान आहे. परग्रहवासियांनी ज्यांनी पिरॅमिड बांधले त्यांनीच वेळ प्रसंगी उपयोगी पडावे म्हणून यां तयार ठेवले आहे. काहींनी या यानाचा शोध केला परंतु स्पिंक्सला धोका पोहचतोय हे दिसताच प्रयत्न थांबले.
2.ही तर वीज निर्मिती केंद्रे
काही संशोधकांच्या मते पिरॅमिड हे आधुनिक वीज निर्मिती केंद्र होते. पृथ्वीच्या पोटात तयार होणाऱ्या साउंड वेव्ह्चा वापर करून तयार होणारी वीज एका विशिष्ठ शाफ्टद्वारे जवळ पासच्या गावामध्ये विना तार पोहचवली जात असे. तो शाफ्ट पूर्वी सोन्याने कव्हर केला होता जेणे करून वीज वहन वेगाने होईल.
तारेचा वापर न करता विजेचे दळणवळ करणे ही एक वेडी कल्पना आहे असे काही तज्ञांना काही वर्षापुर्वी वाटले परंतु आज मोबाईल चार्ज करण्यासाठी वायरलेस उपकरणे बाजारात आली आहेत ते बघता पिरॅमिडच्या डिझाईन मधून वीज निर्मिती होत असेल का या समजुतीने परत उचल खाली आहे.
https://maharashtrabulletin.com/thackeray-movie-nawazuddin-siddiqui/
3. धान्यांची कोठारे :
पिरॅमिड चे स्ट्रक्चर एका विशिष्ठ कोनात बांधले आहे. संशोधकांना या कोणांचा अन पिरॅमिडमधील खोल्यांचा अभ्यास करताना एक विचित्र गोष्ट लक्षात आली ती म्हणजे पिरॅमिड मध्ये ठेवलेल्या नाशवंत वस्तू जसे खाणे, पदार्थ अधिक काल जसेच्या तसे राहते. जणू एखाद्या फ्रीज सारखे. याच कारणांमुळे कदाचित राजाची शरीरे हजारो वर्षे जशीच्या तशी टिकून राहिली असतील का असा विचार करत असतानाच नवीन एक विचार पुढे आला तो म्हणजे “पिरॅमिड ही धान्यांची कोठारे होती”.
आज जगात पिरॅमिडच्या आकाराच्या डब्या वा कंटेनर्स बाजारात मिळतात अन त्यामध्ये ठेवलेले पदार्थ जास्त दिवस टिकतात हे सत्य आहे. पिरॅमिड धान्यांची कोठारे का असतील असा प्रश्न कोणाला पडला नाही कारण जगभर अनेक देशात जगबुडी झाली तर वाचण्यासाठी अनेक वास्तू बांधल्या गेल्या आहेत.
4. परग्रहवासीसाठीचे दिशादर्शक :
पिरॅमिड बद्दलची पुरातन माहित असे दर्शवते की ह्या वास्तू सोन्याने मढवलेल्या होत्या अन त्यामध्ये इलक्ट्रिक लायटरमध्ये असतात तसे “पिझो” बसवले होते. तुम्हाला माहित आहे की लायटरमध्ये विजेची बारीक ठिणगी तयार करण्यासाठी पिझोचा वापर होतो. तसेच पिरॅमिड बांधण्याची जागा ही एका ठराविक पद्धतीने केली आहे जी आकाशातून पाहिली असता एका ठराविक तारकापुंजाकडे तोंड करून आहे. याचा एक अर्थ असा होतो की परग्रहवासीयांना जेव्हा जेव्हा पृथ्वीवर यायचे होते तेव्हा तेव्हा पिरॅमिडमधून पिझोच्या सहाय्याने विजेचा प्रकाश तयार केला जायचा जो सोन्याच्या आवरणामुळे प्रकाशित व्हायचा अन परग्रहवासीयांच्या यानांना त्यामुळे मार्ग कळायचा. म्हणजे ह्या काही वास्तू एका रेषेत बांधल्या गेल्या त्या दिशादर्शक म्हणूनच काम करायच्या.
5. पिरॅमिड चे खरे रचनाकार युरोपियन :
पिरॅमिड बद्दल संशोधन करायला अनेक देशाचे पथक इजिप्तमध्ये धडकून गेले. काहींनी मनोभावे इजिप्त सरकार बरोबर अन त्यांच्यासाठीच करार करून काम केले पण काहींचा हेतू हा पिरॅमिडमधील ऐतिहासिक वस्तूवर डल्ला मारायचाच होता. असो अशाच एक जर्मन पथकाने पिरॅमिडमधील अनेक वस्तू चोरून युरोपमध्ये नेल्या अन त्यावर कार्बन डेटिंग या पद्धतीने पहाणी केली. हेतू हा होता की पिरॅमिड नेमके कधी बांधले गेले त्याचा शोध घेणे. पण झाले असे की पाहणी केल्यावर असे लक्षात आले पिरॅमिड फार फार पूर्वी, म्हणजे इजिप्तचा राजा ज्याने हे सारे पिरॅमिड बांधले असे म्हटले जाते त्याच्या फार पूर्वीच पिरॅमिड तयार होते.
याचा अर्थ राजाने आधीच बांधले गेलेल्या या वास्तूचे क्रेडीट स्वतःकडे घेतले. मग प्रश्न आला की पिरॅमिड बांधले कोणी? अन मग एक नवीन समजूत पुढे आली ती म्हणजे पिरॅमिडचे खरे रचनाकार हे इजिप्शियन नसून त्यापूर्वी विकसित झालेली अटलांटिस संस्कृती होय. कारण प्लूटोच्या काळात युरोपमध्ये वास्तुशास्त्र फार प्रगत होते. म्हणजे पिरॅमिड हे युरोपियन्स बांधले, ना की इजिप्शियन्सनी.
दोस्तहो, आता या साऱ्या झाल्या समजूती. नक्की काय गुपित आहे हे कर्ता करविताच जाणो.