Skip to content Skip to footer

मुंबई-पुणे हायपरलूप ने प्रवास करायचाय ? मग आधी तिकीटाचे दर पाहा

पुणे – अतिवेगवान प्रवासासाठी भविष्यात हायपरलूप चं तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार आहे. हिंदुस्थानातही या तंत्रज्ञानाच्या आधारे ट्यूबरेल्वे चालावी यासाठी धडपड सुरू झाली आहे. मुंबई-पुण्यादरम्यान हायपरलूपचा प्रवास शक्य आहे की नाही याबाबत चाचपणी करण्यात आली आहे. यानंतर पीएमआरडीएने या प्रवासासाठी तिकीटाचे दर किती असावेत याचा अभ्यास केला. अभ्यासाअंती तिकीटाचे ढोबळ अंदाजावर दर जाहीर केले आहेत.

सध्या मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे, एसटीच्या बसेस किंवा खासगी गाड्या यांचा पर्याय उपलब्ध आहे. या तिन्ही पर्यायांसाठी कमाल १०० ते ६०० रूपयांपर्यंत एका दिशेचे तिकीट खरेदी करावे लागते. हायपरलूपने प्रवास करायचा असेल तर प्रवाशाला एका दिशेच्या तिकीटासाठी एक हजार ते दीड हजारापर्यंत खर्च करावे लागू शकतात असा सध्या अंदाज बांधण्यात आला आहे.

मुंबई-पुणे हे अंतर कापण्यासाठी प्रवाशांना रेल्वे किंवा एक्सप्रेस हायवेने जवळपास साडेतीन ते चार तास लागतात. हायपरलूपमध्ये १८० किलोमीटरचे हे अंतर अवघ्या २५ मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे. गहुंजे ते पिंपरीदरम्यान हायपरलूपचा चाचणी मार्ग तयार करण्यात येणार आहे. यासाठीचे काम या वर्षाअखेर डिसेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5