नाशिक : गोदावरी नदीच्या धरणांमधून पाणी सोडल्यानंतर खबरदारी न घेतल्यामुळे नाशिकमधल्या रामकुंडाच्या किनाऱ्यावरील अनेक चारचाकी वाहनं पाण्यात गेली तर काही वाहनं वाहून गेली. त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे रामकुंडात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. नदी शेजारील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय.
रामकुंड परिसरात एवढं पाणी बाहेर येणार असल्याची सूचना देण्यात आली असती तर किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांचं नुकसान टाळता आलं असतं. पावसळ्यात रामकुंडात ज्याप्रकारे चित्र निर्माण होतं तसंच चित्र पाणी सोडल्यामुळे आता नोव्हेंबरमध्येही पाहायला मिळतंय.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक आणि अहमनदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात आलं… सकाळी 8.30 वाजता निळवंडे धरण्याचे पाच दरवाजे उघडून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलंय. निळवंडे धरणातून 3.85 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्यात येतंय. 3 ते 4 दिवसांनी विसर्ग कमी होत जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.