मुंबई– फटाके वाजविण्यासाठी रात्री ८ ते १० वेळेची मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केली असून राज्यात प्रथमच मुंबईत या नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून आरोपींची नावे समोर आली नसून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांकडे स्थानिक आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मध्यरात्री फटाके उडवित असल्याची तक्रार केली. मानखुर्द उपनगरातील महाराष्ट्रनगरमध्ये याची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. कलम १८८ अंतर्गत आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आल्याचे ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश साळवी यांनी सांगितले. राज्य सरकारने फटाके फोडण्यासाठी वेळेची मर्यादा तोडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.