Skip to content Skip to footer

फ्रान्समध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात लोक रस्त्यावर

फ्रान्समध्ये इंधनाच्या वाढत्या दरांविरुद्ध निदर्शनं करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. हे आंदोलक गेल्या दोन आठवड्यांपासून आंदोलन करत आहेत.

चँप्स एल्यिस या ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये ठिणगी पडली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था असूनसुद्धा ही घटना घडली आहे.

या आंदोलनात एकूण 2,80,000 आंदोलकांनी भाग घेतला असून 2000 विविध जागांवर गेल्या शनिवारपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा हा दुसरा टप्पा आहे, असं आंदोलकांचं म्हणणं आहे.

चँप्स एल्यिस या ठिकाणी शनिवारी हजारो आंदोलक जमले. पोलिसांनी अनेक महत्त्वांच्या जागांवर रोखण्यासाठी अनेक ठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यामुळे आंदोलक आणि पोलीस यांच्यात खटके उडाले. आंदोलकांनी महत्त्वाच्या जागेवर अद्याप प्रवेश केलेला नसल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हीडिओत आंदोलक पोलिसांवर फटाके फेकताना तसंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसत आहेत.

सध्या शहरात 3000 पोलीस तैनात आहेत. काही जणांच्या मते राजधानीत 30,000 आंदोलक आहेत.

आंदोलकांच्या रोषाचं कारण काय?

फ्रान्समध्ये डिझेलच्या दरात गेल्या वर्षांपासून 23 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2000पासून ही सगळ्यात मोठी दरवाढ आहे.

जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती वाढल्या, त्यानंतर कमीसुद्धा झाल्या. मात्र मॅक्रॉन सरकारने यावर्षी हायड्रोकार्बन टॅक्स प्रतिलिटर 7.6% वाढवला आहे. तसंच पेट्रोलवर ही वाढ 3.9% टक्क्यांनी झाली आहे.

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी इंधनवाढीसाठी जागतिक पातळीवरील तेलाच्या किमतींना दोषी ठरवले आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांशी निगडित प्रकल्पांच्या निधीसाठी आणखी पैसा उभा करावा लागणार आहे, त्यामुळे खनिज तेलांवर जास्त कर लावावा लागला असं त्यांचं मत आहे.

आंदोलकांनी पिवळ्या रंगाचा चमकदार पोशाख परिधान केला असल्याने याला Yellow jackets असं संबोधण्यात येत आहे.

Leave a comment

0.0/5