Skip to content Skip to footer

मराठा आरक्षणाच्या कृती अहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत???

मुंबई | मराठा आरक्षणाचे विधेयक विधीमंडळात मंजूर झाले. तसा कायदाही राज्यात लागू झाला. मराठा आरक्षणाच्या कृती अहवाल सादर करण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या कृती अहवालातील शिफारशी

1. शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण

2. राज्याच्या लोकसेवांमधील पदांवर आणि नियुक्त्यांवर 16 टक्के जागा राखीव

3. 9 जून 2014 च्या अधिसूचनेनुसार फक्त उन्नत आणि प्रगत गटाखालील व्यक्तींना आरक्षण मिळणार

4. ओबीसी समाजाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण

5. विशेष प्रवर्ग बनवून मराठा्यांना आरक्षण.

6. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध

7. मराठा समाजाची राज्यातील लोकसंख्या 30 टक्के

8. भारतीय प्रशासकीय सेवेत मराठ्यांचे प्रमाण 6.92

9. पोलीस सेवेत मराठ्यांचे प्रमाण 15.92 टक्के

10. मराठा समाजातील केवळ 4.30 टक्के लोक उच्चशिक्षित

11. मराठा वर्ग सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणून घोषित

12. मराठयांना राज्यातील सेवांमध्ये अपर्याप्त प्रतिनिधीत्व

13. आरक्षण देताना 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा पुनर्विचार होणार

14. मराठा वर्ग शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळण्यास पात्र

Leave a comment

0.0/5