राज्यात पडलेल्या दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीला एसटी महामंडळ धावून आलेले आहे या निर्णयाचे सर्व स्थरातून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे कौतुक होत आहे.
आता पर्यंत दुष्काळ भागातील २०५३ विद्यार्थ्यांनी एसटी पासचा लाभ घेतलेला आहे. आज एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या पुढाकाराने नव-नवीन योजना दुष्काळग्रस्थ भागातील शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या शिकणाऱ्या मुलांसाठी राबिवल्या जात आहे. काही दिवसापूर्वी एसटी महामंडळाने जाहीर केलेल्या वाहक आणि चालक भरती प्रक्रियेत दुष्काळग्रस्थ शेतकऱ्यांच्या मुलांना सामाविष्ठ करण्याचा अध्यादेश मंत्री दिवाकर रावते यांनी काढलेला होता. त्यामुळे एसटी महामंडळात होणाऱ्या भरती प्रक्रियेत दुष्काळग्रस्थांच्या होतकरू तरुणांच्या हाताला काम भेटणार आहे.
आज दुष्काळग्रस्थ भागातील शेतकऱ्यांच्या मुलां-मुलींना शिक्षणासाठी गावापासून लांबचा प्रवास करावा लागते परंतु दुष्काळामुळे शेतात उत्पन्न न पिकल्यामुळे शेतकर्त्यांच्या हाताला सुद्धा काम न मिळेनासे झाले आहे. त्यामुळे महिण्याचा पास काढून शहरात शिक्षणासाठी पाठविणे आजच्या गरीब शेतकरी कुटुंबाला न जमणारे आहे. म्हणूनच एसटी महामंडळाने निर्णय घेऊन शिक्षणासाठी परगावी जाणाऱ्या विध्यार्थ्यांना मोफत पास वाटप करून त्यांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येणार नाही याची खास दखल एसटी महामंडळाने घेतलेली आहे आज या निर्णयाचे सर्व स्थरातून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे कौतुक होत आहे.
ही सुविधा १५ नोव्हेंबर २०१८ पासुन पास असलेल्या विद्यार्थ्यांना लागु आहे. ही सवलत १५ एप्रिल पर्यंत चालु राहणार आहे. नवीन पास काढणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार नाही. शैक्षणिक, तांत्रिक व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाना मासिकपासात ६६.६७% सवलत दिली जात असून उर्वरीत ३३.३३% रक्कम घेतली जात असे. ही रक्कम ही माफ करण्यात आली आहे. शासनाने ११ वी व १२ वी वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अहिल्यादेवी होळकर मोफतपासची सुविधा चालु केली आहे. त्यामुळे सर्व विध्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.