Skip to content Skip to footer

औरंगाबाद शिवसेनेत अंतर्गत गटबाजी नाही, जिल्हाप्रमुखांचा दावा

औरंगाबाद : शिवसेनेत अंतर्गत गटबाजी नसल्याचा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश अंतिम असल्याचे त्यांनी सांगितलंय. औरंगाबादेत युतीचा जो उमेदवार असेल त्यांच्यासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी नमूद केले. तर शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचा एकच गट असून त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्याचे खासदार खैंरे यांनी सांगितले. तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्हा परिषदेतली काँग्रेसोबतच्या आघाडीतून बाहेर पडणार असल्याचं अंबादास दानवेंनी स्पष्ट केले. दोन महिन्यांनी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली.

काँग्रेससोबतची युती शिवसेना तोडणार

– शिवसेना औरंगाबाद जिल्हा परिषदेतून काँग्रेससोबतची युती तोडून बाहेर पडणार
– दोन महिन्यांनी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला सोबत घेवून सत्ता स्थापन करणार
– औरंगाबाद शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची माहिती
– सध्या जिल्हा परिषदेत शिवसेना आणि काँग्रेसची एकत्रित सत्ता आहे
– शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती तोडण्याचा सेनेचा निर्णय

Leave a comment

0.0/5