Skip to content Skip to footer

सुजय विखे पाटील यांनी पवारांना आणलं घाईला……

निवडणुकीच्या तोंडावर सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केला. त्यापूर्वीच नगरच्या जागेसाठी विखेंनी राष्ट्रवादीकडे आग्रह धरला होता. परंतु राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिला होता. भाजपा प्रवेशानंतर सुजय विखेंना पहिल्याच यादीत उमेदवारीही मिळाली. राष्ट्रवादीनेही संग्राम जगताप यांना मैदानात उतरवत सुजय विखेंना आव्हान दिले आहे. नगर दक्षिणमध्ये आता सुजय विखे आणि संग्राम जगताप यांच्यात लढत होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस समोर सुजय विखेंना हरवण्याच मोठे आव्हान असणार आहे, त्यामुळे ही लढत अतिशय रंगतदार होणार आहे.

सुजय विखे पाटील यांना हरवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः नगर मध्ये तळ ठोकून बसले आहेत. त्यामुळे एका नवख्या उमेदवाराने राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा वरिष्ठ नेते पवारांना सुद्धा घाईला आणले आहे असेच आज नगर जिल्ह्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यां मध्ये बोलले जात आहे. सुजय यांनी राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी मागितलेली होती परंतु शरद पवारांनी ही उमेदवारी नाकारून संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु सुजय यांच्या तगड्या नगर मधील कामगिरीमुळे सुजय हेच निवडून येणार असेच चिन्ह सध्या तरी दिसून येत आहे आणि त्यामुळेच सुजय यांचा विजयाचा रथ रोखण्यासाठी स्वतः पवारांनी नगरच्या प्रचाराची सूत्रे आपल्या हातात घेतलेली आहे.

खरा वाद हा पवार आणि विखे परिवारात फार पूर्वीपासूनच आहे. १९९१ ची लोकसभा निवडणूकीत बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील वाद अगदीच विकोपाला गेला होता. कॉंग्रेसकडून या जागेवर सरळ दावा होता त्याकाळचे मातब्बर नेते बाळासाहेब विखे यांचा. मात्र असे बोलले जात की शरद पवार यांनी त्यावेळी विखेंच तिकीट कापण्यात आपले सगळ राजकीय वजन वापरले आणि कॉंग्रेसकडून उमेदवारी दिली सोनईच्या यशवंतराव गडाख यांना. त्यामुळे बाळासाहेब विखे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. आज तीच परिस्थिती सुजय यांच्या बाबतीत पवार करून पाहत आहे परंतु सुजय सध्या भाजपा पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे आणि भाजपाला नाकीनऊ आणणे सध्या तरी पवारांना न जमणारे आहे त्यामुळे सुजय यांचा विजय नगरमध्ये निश्चित असाच मानला जात आहे.

Leave a comment

0.0/5