Skip to content Skip to footer

बारामती नगर पालिका मध्ये १५ लाखाची चोरी

बारामती नगर पालिका मध्ये चोरट्यांनी नगरपालिकेच्या रकमेवर डल्ला मारला आहे. यात एकूण १५ लाखाची रोकड चोरीला गेल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे बारामती शहरात एक प्रकारे खळबळ उडालेली आहे. या चोरीच्या प्रकरणा बद्दल पोलीस स्थानकात रीतसर तक्रार सुद्धा करण्यात आलेली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी आज बारामती नगरपालिकेला भेट देऊन या सर्व घटनेची पाहणी केली होती. बारामती नगरपालिका ही राष्ट्रवादी पक्षाच्या देखरेतेखाली आहे.

ही चोरी नेमकी कश्या प्रकारे करण्यात आली या बद्दल सध्या पोलीस खाते तपास करत आहे. बारामती नगर परिषेदेत मार्च महिन्या असल्यामुळे थकीत पाणीपट्टी आणि घरपट्टी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जमा केलेली होती. असे सुद्धा नगर पालिकेच्या कार्यालयीन कर्मचार्यांन कडून सांगण्यात येत आहे. बारामती हे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो आणि आज त्यांच्या बालेकिल्ल्यात चोरी झाल्यामुळे पवार सत्ता आल्यावर राज्याची तिजोरी कसे काय सांभाळू शकतात असा सवालच बारामतीकरांनी उपस्थित केलेला आहे. या घटने नंतर बारामती शहरात खळबळ माजली आहे त्यामुळे नेमकी चोरी आहे की अजून काही दुसरा प्रकार आहे अशी कुजबुज सध्या बारामती शहरात होत आहे.

Leave a comment

0.0/5