Skip to content Skip to footer

विरोधकांची काळजी घेणारा शिवसेना पक्षाचा उमेदवार- प्रा. मंडलिक

कोल्हापूर जिल्ह्यचे शिवसेना उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी एक नवा आदर्श निर्माण करून दिलेला आहे. निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. पण या सर्व गोष्टीला अपवाद ठरले ते संजय मंडलिक त्यांनीं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती केली आहे. आपण सर्व कोल्हापूरकर आणि देशवासीय निवडणुकीला सामोरे जात आहोत. आपल्या सर्वांना वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याचा प्रचार आणि प्रसाराचा सर्वांनी लाभ घ्या परंतु कोणावर टीका-टिपनी करताना त्यातील खोटारडेपणा पाहूनच संदेश वायरल करा अथवा करू नका. असा संदेश त्यांनी आपल्या विरोधकांना आणि कार्यकर्त्यांना सुद्धा दिलेला आहे.

आज आपल्या विरोधकांचा सुद्धा विचार करणार असा उमेदवार कोल्हापुरातील जनतेला प्रथमच मिळालेला आहे असेच बोलेल जात आहे. आज आपण केलेल्या विकासाच्या मुद्द्यांवर मत मागण्या पेक्षा विरोधक उमेदवारावर खालच्या पातळीची टीका केली जात आहे असे सुद्धा बोलून दाखविले होते. त्याचमुळे कोल्हापूरच्या प्रश्नावर आणि विकासावर मत मागण्याचे काम सध्या प्रा. संजय मंडलिक करत असताना दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला प्राध्यपक मंडलिक भरघोस मतांनी निवडणून येतील अशीच चर्चा सध्या चालू असताना दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5