शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील तरुणांचे नव्हे तर संपूर्ण देशातील तरुणांचे युथ आयकॉन आहेत. याची दखल घेऊन झी युवा सम्मान या पुरस्काराने सुद्धा सम्मानित करण्यात आलेले होते.आज युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवासेना मार्फत त्याचे कार्यकर्ते आणि पदाधीकारी काम करतच आहेत. त्यातूनच आज तरुणांचे आणि तरुणींचे प्रश्न सोडवण्यासाठी “आदित्य संवाद” एक द्विपक्षीय संवाद मंच लॉन्च करण्यात आलेला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून संभाजी नगर येथे येत्या २ एप्रिल रोजी आदित्य ठाकरे युवकांशी मुक्त संवाद साधणार आहे.
महाराष्ट्रातील तरुणांच्या आशा आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी आदित्य ठाकरे महाराष्ट्रात प्रवास करणार आहे आणि आदित्य संवाद या माध्यमातून तरुणांशी संवाद साधणार आहे. आदित्य संवाद एक असा उपक्रम आहे जो आदित्य ठाकरे आणि महराष्ट्रातील तरुणांच्या बाजूने संप्रेक्षक मंच स्थापन करण्याचा प्रयत्न करेल. आदित्य संवादाच्या मोहिमेत ६ लाख लोक थेट आणि १५ लाख लोक डिजिटल पातळीवर पोहचवण्याचा प्रयत्न करतील. आदित्य ठाकरे आणि तरुणांना मध्ये संभाषणासाठी हा आदित्य संवाद स्थापन करण्यात आलेला आहे.
पहिला कार्यक्रम सरस्वती महाविघालय संभाजी नगर येथे दिनांक २ एप्रिल २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. पुढे नाशिक- ७ एप्रिल, कोल्हापूर – १३ एप्रिल, मुंबई – २१ एप्रिल आणि पिपरी-चिंचवड -२४ एप्रिल अशी कार्यक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी www.adityasavad.com या साइड जाऊन आधी रजिस्टर करावे लागेल असे ही सांगण्यात येत आहे. त्यामुळे या पैकी कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता किंवा थेट प्रश्न सुद्धा विचारू शकता असे ही सांगण्यात येत आहे.